आज 14/12/2020 कुर्ला येथील केंद्रिय सहाय्यक श्रम आयुत्तांकडे, *एमटीएनएल प्रशासन, पेन्शनर्सच्या वैद्यकिय बिलांची परिपूर्ती करीत नसल्याने दाखल केलेल्या तक्रारीची [Complaint] सुनावणी होती. सदर सुनावणीला आपल्या संघटनेतर्फे सर्वश्री एस.एम.सावंत आणि ई.एम.राजपूरे हजर होते.* पण केंद्रिय सहाय्यक आयुक्त Trainingला गेल्यामुळे सुनावणी होवू शकली नाही. आपल्या संघटनेतर्फे आपली बाजू लिखीत स्वरूपात दाखल करण्यात आली. सुनावणीची पुढील तारिख १९/०१/२०२१ आहे. आपल्या माहितीसाठी. त्यानंतर आमचे महाप्रबंधक {वित्त}- Finance यांच्याशी फोनवर बोलणे झाले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ज्यांनी VRS 2019 घेतली आहे त्यांच्या Leave encashmentचे पैसे या महिन्याअखेर मिळण्याची शक्यता आहे. आमच्या माहिती प्रमाणे LICकडून Group Insuranceची रक्कम पाठवण्याची सूरवात झाली आहे.त्यामूळे VRS opteesचे insuanceचे पैसे लवकरच मिळण्याची शक्यता आहे. त्याबाबतची सविस्तर माहिती लवकरच देवू. एस.एम.सावंत आणि कार्यकारीणी MPWA.